दोघा चिमुकल्या गिर्यारोहकांची अफलातून कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:37 IST2021-03-04T04:37:38+5:302021-03-04T04:37:38+5:30
शहरातील गिर्यारोहक सचिन भांड, दत्ता बैरागी, डॉ. योगेश गाडेकर, साइराज निफडकर यांचे या चिमुकल्यांना मार्गदर्शन मिळाले. नाशिक येथील पॉईंट ...

दोघा चिमुकल्या गिर्यारोहकांची अफलातून कामगिरी
शहरातील गिर्यारोहक सचिन भांड, दत्ता बैरागी, डॉ. योगेश गाडेकर, साइराज निफडकर यांचे या चिमुकल्यांना मार्गदर्शन मिळाले. नाशिक येथील पॉईंट ब्रेक ॲडव्हेंचर समूहाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली.
मनमाड शहराच्या जवळ उत्तुंग असा अंगठ्याच्या आकाराचा सुळका सर करणे तसे कठीणच आहे. कारण त्याला पाहूनच तो सर करण्याच्या विचाराने पाचावर धारण बसते. हा सुळका सर करण्याची प्रत्येक गिर्यारोहकाची इच्छा असते. ही शेंडी सर करायचीच या इराद्याने श्रीरामपुरातील या दोघा गिर्यारोहकांनी मोहिमेत सहभाग घेतला. गत रविवारी ८ वाजता मोहिमेला सुरवात झाली. सुळक्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्यास निसरड्या वाटेने जवळ पास अर्धा तासांची चढाई करावी लागली. तेथे पॉइंट ब्रेकच्या सदस्यांच्या सहकार्याने दोर लावून सुळक्याच्या मार्ग सुकर करण्यात आला. स्पर्श आणि ऋषिकेश या दोघांनी भर उन्हात अनुभवी गिर्यारोहकांच्या मदतीने अवघ्या एका तासात हा सुळका न घाबरता अतिशय धैर्याने सर केला.
तांत्रिकदृष्ट्या अवघड असलेल्या सुळक्यावर यशस्वीरीत्या चढाई करून माथ्यावर पोहोचल्यानंतर त्यांना मनस्वी आनंद झाला. या दोघा साहसवीरांनी श्रीरामपूरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला.
-------