पोलीस दलातर्फे ‘रेझिंग डे’ सप्ताहानिमित जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:06 IST2021-01-08T05:06:22+5:302021-01-08T05:06:22+5:30

२ ते ८ जानेवारी रेझिंग डे सप्ताह आहे. या निमित्त घारगाव येथील भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस ...

Awareness raising on the occasion of 'Raising Day' by the police force | पोलीस दलातर्फे ‘रेझिंग डे’ सप्ताहानिमित जनजागृती

पोलीस दलातर्फे ‘रेझिंग डे’ सप्ताहानिमित जनजागृती

२ ते ८ जानेवारी रेझिंग डे सप्ताह आहे. या निमित्त घारगाव येथील भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत यांसह पोलीस कॉन्स्टेबल किशोर लाड,राजेंद्र लांघे,गणेश तळपाडे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामकाजाची माहिती व शस्त्र हाताळणीबाबतचे माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये पिस्टल, एस.एल.आर. कार्बाईन मशिन गन, पम्प अॅक्शन गन आदी शस्त्रांची माहिती देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक राऊत यांनी विद्यार्थ्यांना पोलीस कामकाजाविषयी व शस्त्र हाताळणीविषयी माहिती दिली. यावेळी विद्यालयातील प्राचार्य रामदास खरात यांच्यासह शिक्षक जालिंदर पिसाळ, विजयराज कडाळे, बाबासाहेब खंडागळे आदिंसह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो‌-०४ घारगाव पोलीस

....

ओळी : विद्यार्थिनींना शस्रांविषयी माहिती देताना पोलीस उपनिरीक्षक धीरज पाटील व पोलीस कर्मचारी.

Web Title: Awareness raising on the occasion of 'Raising Day' by the police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.