तंत्रज्ञानाच्या आधारे माहिती देऊन शेतकऱ्यांची जागरूकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:59+5:302021-07-11T04:15:59+5:30
गोगलगाव येथे आधुनिक शेती खते बी-बियाणे माती परीक्षण सेंद्रिय शेती औषध फवारणी या विषयावर शेतकऱ्यांना हर्षवर्धन मार्गदर्शन करणार ...

तंत्रज्ञानाच्या आधारे माहिती देऊन शेतकऱ्यांची जागरूकता
गोगलगाव येथे आधुनिक शेती खते बी-बियाणे माती परीक्षण सेंद्रिय शेती औषध फवारणी या विषयावर शेतकऱ्यांना हर्षवर्धन मार्गदर्शन करणार आहे.
दहा आठवड्यांच्या कालावधीत हर्षवर्धन हा शेतातील माती परीक्षण, फळबाग लागवड, एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन, जनावरांचे लसीकरण, आदींबाबत गोगलगांव परिसरातील गावकऱ्यांशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. नवीन कृषी धोरण व तंत्रज्ञान याच्या आधारे शेतकऱ्यांना सखोल माहिती देऊन त्यांचे प्रात्यक्षिक तो यावेळी शेतकऱ्यांना देणार आहे. या उपक्रमामुळे आधुनिक शेतीला दिशा मिळेल असा विश्वास हर्षवर्धन याने व्यक्त केला. कृषी जागरूकता व कृषी कार्यानुभव विषयांतर्गत गोगलगांव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी यावेळी स्वागत केले. सरपंच भाऊसाहेब खाडे, उपसरपंच अनिल चौधरी, सदस्य दीपक मगर, ग्रामसेविका अर्चना हारदे, कृषी सहायक नितीन शिंदे, ज्ञानेश्वर उडदंगे उपस्थित होते.
विखे-पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे, उपप्राचार्य डॉ. एच. एल. शिरसाठ डॉ. व्ही. एस. निकम, डॉ. एस. बी. राऊत, कार्यक्रम समन्वयक के. एस. दांगडे, पी. आर. हसनाळे, के. बी. मोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
100721\img_20210708_120349.jpg
गोगलगांव येथे कृषिदूतांचे स्वागत करताना ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ