जिल्ह्यातील १९ शेतकऱ्यांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:34+5:302021-07-02T04:15:34+5:30
अहमदनगर : कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून ...

जिल्ह्यातील १९ शेतकऱ्यांना पुरस्कार
अहमदनगर : कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट शेतकरी पुुरस्कार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कृषिदिनाचे औचित्य साधून शेतकरी पुरस्कार प्रदान सोहळा व कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप करण्यात आला. कृषी विभाग आत्माअंतर्गत नाथा देशमुख, सतीश पालवे, नवनाथ सायकर, अविनाश लहाणे, संजय वागस्कर, रामेश्वर जगताप, ताराचंद गागरे, बाळासाहेब खरात, शांताराम बारामते, मीनाक्षी निर्मल यांना व कृषी विभागाच्या वतीने भानुदास थोरात, पांडुरंग कर्डिले, बबन पागिरे, हरिभाऊ म्हस्के, देवीदास खाटिक, कृष्णा परदेशी, धनराज पवार, आबासाहेब वावरे, महेश म्हस्के या शेतकऱ्यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा घुले म्हणाल्या, वसंतराव नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सर्वांत जास्त काळ काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात कृषी विधायक धोरण, महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण व विविध योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या. कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी त्यांनी बहुमोल योगदान दिले. राज्याला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. दूरदृष्टी असलेले कै. नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरी केली जाते. कै. नाईक यांनी पाहिलेले हरितक्रांतीचे स्वप्न साकार झाले आहे, असे सांगितले. याप्रसंगी कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, कृषी उपसंचालक विलास नलगे, कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी, तंत्र अधिकारी अशोक डमाळे, कृषी अधिकारी प्रमोद साळवे, प्रवीण गोरे, कौस्तुभ कराळे, प्रकाश महाजन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कांतीलाल ढवळे यांनी केले. आभार सुनीलकुमार राठी यांनी मानले.
..................०१ झेडपी पुरस्कार
उत्कृष्ट शेतकरी पुुरस्कार प्रदान करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले. समवेत काशिनाथ दाते, जगन्नाथ भोर, शिवाजीराव जगताप, विलास नलगे, सुनीलकुमार राठी, अशोक डमाळे, प्रमोद साळवे आदी.