औटींवर कार्यकर्ते नाराज

By Admin | Updated: July 25, 2014 00:25 IST2014-07-25T00:10:41+5:302014-07-25T00:25:34+5:30

पारनेर : पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या कार्यपद्धतीवर सेना-भाजपाचे कार्यकर्ते नाराज आहे.

Awaiting activists angry | औटींवर कार्यकर्ते नाराज

औटींवर कार्यकर्ते नाराज

पारनेर : पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या कार्यपद्धतीवर सेना-भाजपाचे कार्यकर्ते नाराज असून, फलक वाद निमित्ताने त्याचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट करीत सेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी आमदार औटींवर तोफ डागली. मात्र, आमदार औटींसोबत मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले़
पारनेर तालुक्यातील निघोज येथील एका कार्यक्रमानंतर गाडे पत्रकारांशी बोलत होते़ सध्या नगर तालुक्यात आमदार औटी विरुद्ध सेना कार्यकर्ते यांच्यात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गाडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आमदार औटी व सेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांना डावलून कार्यक्रमाला आलो नसून शिवसैनिकांनी बोलावल्यावर जावे लागते. माझ्यात व आमदार औटी यांच्यात मतभेद नाहीत तर कार्यकर्त्यांमध्ये आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. साडेचार वर्षात आमदार विजय औटी यांच्या कार्यपद्धतीवर असलेल्या आक्षेपाचा उद्रेक झाला म्हणून आमदार शिवाजी कर्डिले व आम्ही कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या व अन्यथा शिवसैनिक दुसरीकडे जातील अशी भीती व्यक्त केली. सेनेच्या संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत लवकरच मेळावा घेणार असून त्यानंतर आमदार औटी व शिवसैनिकांमधील मतभेद दूर होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)
औटी यांना डावलून गाडे यांचा दौरा
आमदार विजय औटी व सेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांना डावलून सेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी पारनेर तालुक्यातील निघोज येथील एका कार्यक्रमात हजेरी लावली. राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष खंडू भुकन यांचे कट्टर समर्थक व सध्या नावापुरते भाजपात असणाऱ्या नेत्याने हा कार्यक्रम भैरवनाथ दूध उत्पादक संस्थेत आयोजित केला होता़ राष्ट्रवादी समर्थकाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने गाडे यांच्याबद्दल शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Awaiting activists angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.