मालमत्ता कर थकविल्याप्रकरणी दोन जिनिंग मिलला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:39 IST2021-03-04T04:39:37+5:302021-03-04T04:39:37+5:30

शेवगाव : शेवगाव नगर परिषद हद्दीतील दोन जिनिंग मिलला नगर परिषद प्रशासनाने बुधवारी सायंकाळी टाळे ठोकले आहे. मालमत्ता कर ...

Avoid two ginning mills in case of property tax evasion | मालमत्ता कर थकविल्याप्रकरणी दोन जिनिंग मिलला टाळे

मालमत्ता कर थकविल्याप्रकरणी दोन जिनिंग मिलला टाळे

शेवगाव : शेवगाव नगर परिषद हद्दीतील दोन जिनिंग मिलला नगर परिषद प्रशासनाने बुधवारी सायंकाळी टाळे ठोकले आहे. मालमत्ता कर थकविल्याने ही कारवाई करण्यात आली.

प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या सूचनेनुसार, तर मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. खुंटफळ रोडवरील थिरेश सूर्यकांत मोता यांच्या मालकीची सिद्धिविनायक जिनिंग मिल यांच्याकडे २९ लाख ८१ हजार १६५, तर द्वारकानाथ बन्सीधर लाहोटी यांच्या नाथ जिनिंग मिलकडे २० लाख ७० हजार ८४६ रुपये मालमत्ता कर थकल्याने कर अधीक्षक डी. सी. साळवे यांच्या नेतृत्वाखाली कर निरीक्षक डी. डी. कोल्हे, अशोक सुपारे, अनिल लांडे आदींच्या पथकाने कारवाई केली आहे.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते संत गाडगेबाबा चौकादरम्यानच्या अतिक्रमणधारकांना पालिका प्रशासनाने अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे.

Web Title: Avoid two ginning mills in case of property tax evasion