शरद भोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:21 IST2021-04-01T04:21:09+5:302021-04-01T04:21:09+5:30

संगमनेर : तालुक्यातील पठारभागातील खंदरमाळवाडी (भोर मळा) येथील रहिवासी, प्रगतिशील शेतकरी शरद माधव भोर (वय ६५) यांचे मंगळवारी अल्पशा ...

Autumn dawn | शरद भोर

शरद भोर

संगमनेर : तालुक्यातील पठारभागातील खंदरमाळवाडी (भोर मळा) येथील रहिवासी, प्रगतिशील शेतकरी शरद माधव भोर (वय ६५) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. दिवंगत स्वातंत्र्यसैनिक माधव भोर यांचे ते पुत्र होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. खंदरमाळवाडी येथील प्रगतिशील शेतकरी भरत भोर, पुणे जिल्ह्यातील चाकण येथील व्यावसायिक संदीप भोर व मंगेश भोर यांचे ते वडील होत.

....................

मुक्ताबाई होन

चांंदेकसारे : येथील मुक्ताबाई मोहनराव होन (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. कोल्हे कारखान्याचे संचालक संजय होन यांच्या चुलती तसेच भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब होन व बाबासाहेब होन यांच्या मातोश्री होत.

....................

पोपटगिरी महाराज

चांंदेकसारे : मढी बुद्रुक येथील रहिवाशी संत जनार्दन स्वामी यांचे परमशिष्य पोपटगिरीजी गवळी महाराज यांचे वयाच्या ५५व्या वर्षी शिवआश्रम, कोळगावपाटी येथे निधन झाले.

................

बादशहा हासे

अकोले : तालुक्यातील म्हाळादेवी येथील बादशहा केरू हासे (वय ६८) यांचे निधन झाले. मुंबई येथील बिजली कंपनीतून आठ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सतीश व विवेक हासे, सुषमा अरुण सावंत यांचे ते वडील होत. औषध विक्रेता संघटनेचे जिल्हा कार्ययकारिणी सदस्य रुंभोडी येथील अरुण सावंत यांचे ते सासरे होत.

Web Title: Autumn dawn