शेवगावात लहूजी सेनेचा आसूड मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 15:20 IST2017-10-12T15:19:31+5:302017-10-12T15:20:53+5:30

शेवगाव : क-हे टाकळी येथील मातंग समाजाच्या कुटुंबावर दाखल केलेले अन्यायकारक गुन्हे मागे घ्यावेत व या कुटुंबाची बदनामी करून ...

Aung Morcha of Lewaji Sena in Shevgaon | शेवगावात लहूजी सेनेचा आसूड मोर्चा

शेवगावात लहूजी सेनेचा आसूड मोर्चा

शेवगाव : क-हे टाकळी येथील मातंग समाजाच्या कुटुंबावर दाखल केलेले अन्यायकारक गुन्हे मागे घ्यावेत व या कुटुंबाची बदनामी करून त्यांना त्रास देणा-यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शेवगाव तालुका लहूजी सेनेच्या वतीने शेवगाव तहसील कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला होता.
क्रांती चौक ते तहसील कचेरी या मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला़ क-हे टाकळी येथील ग्रामसेवकावर त्वरित कारवाई करावी, या गावातील भिल्ल समाजाच्या स्मशानभूमीसंदर्भात निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नाची चौकशी करावी, या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले़ मोर्चाचे नेतृत्व बाळासाहेब बागुल, सुरेश आढांगळे, हनीफ पठाण व ज्योती तेलतुंबडे यांनी केले. मोर्चात मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Aung Morcha of Lewaji Sena in Shevgaon