शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवारी (दि. १०) गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. संस्थेचे सचिव डॉ. अनिल राठी, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य प्रा. संजय नेने, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ आदी उपस्थित होते.
दहावी ते बारावी या तीन वर्षांत कठोर परिश्रम व त्याग करून विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विद्यार्थ्यांची संकल्पशक्ती जागृत झाल्याने त्यांना चांगले गुण मिळणे शक्य झाले. प्रत्येक विद्यार्थ्याचे नामांकित संस्थेत शिक्षण पूर्ण करण्याचे ध्येय असले पाहिजे, असेही डॉ. मालपाणी म्हणाले. स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. ढमक यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शरद सावंत यांनी केले. पर्यवेक्षक प्रा. अप्पासाहेब गुंजाळ यांनी आभार मानले. गुणवंत विद्यार्थांचे व्यवस्थापन सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी यांनी कौतुक केले.