भिंगारमध्ये ३० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:36 IST2021-02-05T06:36:13+5:302021-02-05T06:36:13+5:30

राज्यात कोरोनाचे संकट कमी होत असतानाच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय ...

Attendance of 30% students in Bhingar | भिंगारमध्ये ३० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

भिंगारमध्ये ३० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

राज्यात कोरोनाचे संकट कमी होत असतानाच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याच अनुषंगाने राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारी सुरू झाल्या आहेत. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या.

अहमदनगर छावणी परिषद शाळा येथील शिक्षकांनी शाळेतील कोरोनासंबंधित सर्व प्रकारची खबरदारी घेत सर्व वर्ग सॅनिटायझरने स्वच्छ केले. विद्यार्थ्यांचे तापमान तपासले गेले. मास्क घालूनच वर्गात प्रवेश दिला. पालकांना आपल्या पाल्याला घरी घेऊन जा व शाळेत आणून सोडा अशा सूचना दिलेल्या आहेत.

..............

शाळेच्या पहिल्या दिवशी ३० टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे. सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित सूचना देऊन तपासून वर्गात बसू दिले जाते व सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे काम छावणी परिषदचे सर्व शिक्षक करत आहेत.

-संजय शिंदे, शिक्षक, छावणी परिषद शाळा

Web Title: Attendance of 30% students in Bhingar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.