श्रीरामपुरात तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न, डोक्यात दांडा मारला; रहाटपाळण्यात बसण्यावरून जुना वाद
By शिवाजी पवार | Updated: April 24, 2023 16:48 IST2023-04-24T16:47:35+5:302023-04-24T16:48:16+5:30
या तिघा जणांनी तरुणाच्या डोक्यात लोखंडी दांडा मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला.

श्रीरामपुरात तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न, डोक्यात दांडा मारला; रहाटपाळण्यात बसण्यावरून जुना वाद
शिवाजी पवार
श्रीरामपूर (अहमदनगर) : शहरात दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या श्रीराम नवमी यात्रोत्सवातील रहाटपाळण्याच्या वादावरून हाणामारी झाली. या तिघा जणांनी तरुणाच्या डोक्यात लोखंडी दांडा मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला.
शहर पोलिस ठाण्यात अनिकेत बाळासाहेब फुलपगार (वय २३, मजुरी, रा.रासकरनगर, श्रीरामपूर) याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गोरख जेधे, रामा वादे आणि सुत्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात्रेदरम्यान एका तरुणांना भोकसण्यात आले होते. त्यानंतर घडलेली ही दुसरी घटना आहे.
शहरात ३० मार्चला यात्रोत्सव सुरू झाला होता. मात्र विनापरवानगी सुरू असलेल्या रहाटपाळण्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यामुळे अवघ्या पाच दिवसात पाळणे बंद झाले होते.
पाळण्यात मोफत बसण्याच्या कारणावरून तिघा जणांनी आपल्याला मारहाण केल्याचे फुलपगार याचे म्हणणे आहे. त्याला नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फुलपगार याने सांगितले. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.