श्रीगोंदा कारागृहात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 16:44 IST2018-07-05T16:43:25+5:302018-07-05T16:44:23+5:30
श्रीगोंदा येथील दुय्यम कारागृहात दरोड्याच्या गुन्ह्यात न्यायालयात कोठडीत असलेला शाहरूख आरकस काळे (वय २१, रा. रांजणगाव,ता. पारनेर) याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास चार क्रमांकाच्या कोठडीत हा प्रकार झाला.

श्रीगोंदा कारागृहात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील दुय्यम कारागृहात दरोड्याच्या गुन्ह्यात न्यायालयात कोठडीत असलेला शाहरूख आरकस काळे (वय २१, रा. रांजणगाव,ता. पारनेर) याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास चार क्रमांकाच्या कोठडीत हा प्रकार झाला.
याबाबत पोलीस काँस्टेबल रमाकांत परिट यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिवाळीदरम्यान हिरडगाव व कोकणगाव शिवारातीला दरोड्याच्या गुन्ह्यात श्रीगोंदा पोलिसांनी शाहरूख व त्याच्या साथीदारांना अटक केल्यापासून ते या कारागृहात आहेत. बुधवारी रात्री १२ ते २ वाजेदरम्यान महिला मध्यरात्री शाहरूखने अंगातील बनियनची काढले. या बनियनपासून दोरी केली. रात्री १२ ते २ वाजेपर्य$ंत सर्व कोठडीतील आरोपीची पाहणी केली. त्यानंतर शाहरुख गजाच्या वरील बाजुस दोरी गुंतवली. शाहरुखने या दोरीत गळा गुंतवतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर आरोपींनी आरडा ओरडा करताच पोलिस धावले इतर आरोपीच्या मदतीने शाहरुखचा जीव वाचविला. पो. कॉस्टेबल रमाकांत परीट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख काळे याच्या भा.द.वि. कलम ३०९ अन्यवे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.