प्रजासत्ताकदिनी संगमनेरात आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:30 IST2021-02-05T06:30:51+5:302021-02-05T06:30:51+5:30

७३ वर्षीय वयोवृद्ध कदम हे संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील रहिवासी आहेत. भाडेकरूच्या त्रासाला कंटाळून आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी पोलीस ...

Attempt of self-immolation in Sangamnera on Republic Day | प्रजासत्ताकदिनी संगमनेरात आत्मदहनाचा प्रयत्न

प्रजासत्ताकदिनी संगमनेरात आत्मदहनाचा प्रयत्न

७३ वर्षीय वयोवृद्ध कदम हे संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील रहिवासी आहेत. भाडेकरूच्या त्रासाला कंटाळून आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी पोलीस प्रशासनाला लेखी कळविले होते. भाडेकरू सादिक रज्जाक शेख, सुनिता ऊर्फ सुमय्या सादिक शेख यांनी माझ्या घरावर अतिक्रमण केले आहे. माझ्यावर अन्याय होत असून माझे शारीरिक, आर्थिक, मानसिक नुकसान होण्याची नामुष्की ओढविली आहे. त्यामुळे मी २६ जानेवारी २०२१ ला कुठेही, केव्हाही माझे जीवन संपवील. त्याची सर्वस्वी जबाबदारी शेख यांच्यावर राहील, असे दिलेल्या निवेदनात म्हटले असून त्यावर सहीदेखील आहे.

.....

सहायक फौजदारांची सर्तकता

अनिल कदम यांनी त्यांच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून स्वत:ला पेटवून घेतले. हा प्रकार लक्षात येताच संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार राजा गायकवाड व सहायक फौजदार रावसाहेब कदम या दोघांनीही पेटवून घेतलेल्या कदम यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्या अंगावर पाणी टाकले. भाजलेल्या कदम यांना तात्काळ पोलिसांनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

.....

शेख हे राहत असलेली जागा अनिल शिवाजी कदम यांच्या नावावर नाही. त्यामुळे कदम यांनी केलेली मागणी संयुक्तिक नाही. पोलीस त्यात कारवाई करू शकत नाही. तसे कदम यांना समजून सांगण्याचा प्रयत्न पोलिसांनी अनेकदा केला होता.

-राहुल मदने, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग

Web Title: Attempt of self-immolation in Sangamnera on Republic Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.