अंगावर पेट्रोल टाकून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:21 IST2021-04-10T04:21:20+5:302021-04-10T04:21:20+5:30

श्रीगोेेंदा : पेडगाव येथील विशाल पांडुरंग चव्हाण या तरुणाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ...

Attempt to kill a young man by throwing petrol on his body | अंगावर पेट्रोल टाकून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

अंगावर पेट्रोल टाकून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

श्रीगोेेंदा : पेडगाव येथील विशाल पांडुरंग चव्हाण या तरुणाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बुधवारी घडली.

अमूल अरण्या पवार (रा. टाकळी लोणार, ता. श्रीगोंदा) याने विशाल चव्हाण याला रस्त्यात अडविले. तुझ्या बापाने माझ्या बायकोला जाळून मारले आहे. मी तुला सोडणार नाही, अशी दमदाटी करत त्याने विशाल व त्याची आई अनिता यांना मारहाण केली. त्यानंतर अमूल पवार, सागर कान्हू काळे, तुषार कान्हू काळे, कांग्या कान्हू काळे, मंदिनी सागर काळे, सागर शांताराम चव्हाण, पग्या मिलट्या पवार (सर्व रा. पेडगाव झोपडपट्टी, ता. श्रीगोंदा) यांनी विशाल चव्हाण याच्या घरात घुसून त्यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. सोबत आणलेले पेट्रोल विशालच्या अंगावर ओतून त्याला पेटवून दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित गट करीत आहेत.

Web Title: Attempt to kill a young man by throwing petrol on his body