कोपरगावच्या तहसीलदारांवर हल्ला
By Admin | Updated: May 17, 2016 23:57 IST2016-05-17T23:57:37+5:302016-05-17T23:57:37+5:30
कोपरगाव : येथील तहसीलदार इंदिरा चौधरी यांना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली. थेट महिला अधिकाऱ्याला मारहाण झाल्याने कोपरगावात एकच खळबळ उडाली

कोपरगावच्या तहसीलदारांवर हल्ला
कोपरगाव : येथील तहसीलदार इंदिरा चौधरी यांना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली. थेट महिला अधिकाऱ्याला मारहाण झाल्याने कोपरगावात एकच खळबळ उडाली. मारहाणीचे कारण समजू शकले नसले, तरी वैयक्तिक कारणातून किंवा वाळूतस्करांनी हा हल्ला केल्याची चर्चा होती.
दोन दिवसांपूर्वी तहसीलदार इंदिरा चौधरी यांनी वारी येथून १३५ ब्रास अवैध वाळूसाठा जप्त केला होता. त्याच कारणातून वाळूतस्करांनी हा हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास नाशिक येथून चारचाकीत आलेल्या अज्ञात पाच ते सहा जणांनी हा हल्ला केल्याचे समजते. हल्ला झाला तेव्हा तहसीलदार त्यांच्या राहत्या घरी कुटुंबीयांसह होत्या. हल्लेखोर अचानक आले व मारहाण करून फरारही झाले. यात चौधरी जखमी झाल्या आहेत. दरम्यान, घटनेची माहिती समजताच तहसीलदारांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी जमली होती. रात्री उशिरापर्यंत पोलीस दाखल झालेले नव्हते. (प्रतिनिधी)