समविचारी संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 18:43 IST2018-05-23T18:42:49+5:302018-05-23T18:43:32+5:30
चार वर्षे सत्ता काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या मोदी सरकारच्या कारभाराविरुध्द बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर भाकपसह डावे पक्ष व सर्व समविचारी संघटनांच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात असंतोष व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

समविचारी संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल
अहमदनगर: चार वर्षे सत्ता काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या मोदी सरकारच्या कारभाराविरुध्द बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर भाकपसह डावे पक्ष व सर्व समविचारी संघटनांच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात असंतोष व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
भाजपच्या चार वर्षाच्या सत्ताकाळात त्यांनी कोणती चांगली कामे केली. याचा जाब विचारण्यासाठी देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यलया समोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाकपचे राज्य सह सचिव कॉ.सुभाष लांडे, कॉ.महेबुब सय्यद, कॉ.प्रशांत गायकवाड, कॉ.सुधीर टोकेकर, कॉ.बहिरनाथ वाकळे, कॉ.शंकर न्यालपेल्ली, कॉ. बाबा आरगडे, महादेव पालवे, लक्ष्मण नवले, शारदा बोगा, श्रीधर आदिक, भगवानराव गायकवाड, बापू राशीनकर, आप्पासाहेब वाबळे, अंबादास दौंड, पांडुरंग शिंदे, दिपक शिरसाठ, सतीश निमसे, लक्ष्मी कोडम, शोभा बिमन, विकास गेरंगे आदिंसह डावे पक्ष व सर्व समविचारी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भाजपा सरकारने निवडणुकीच्या काळात काढलेल्या जाहिरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार, दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करणार, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करणार, शेतकºयांची संपुर्ण कर्जमाफी करणार, राज्य भ्रष्टाचारमुक्त करणार, स्विस बँकेतील काळा पैसा भारतात आनणार आणि भारतातील जनतेसाठी अच्छे दिन आनणार अशी अनेक आश्वासने या सरकारने दिली होती. परंतू प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. फक्त भाजप व त्यांच्या आमदार, खासदार व मंत्र्यांनाच अच्छे दिन आल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला.