श्रीगोंदा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 12:46 IST2019-01-29T12:45:38+5:302019-01-29T12:46:16+5:30

श्रीगोंदा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Atrocity on minor girls in Shigonda taluka | श्रीगोंदा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

श्रीगोंदा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

श्रीगोंदा : तालुक्यातील अजनुज येथील अकरा वर्षीय शाळकरी मुलीवर गावातीलच तरूणाने अत्याचार केला. याप्रकरणी राहुल दत्तू रोकडे याच्याविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवार (दि.२८) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शाळेची जेवणाची सुटी झाली होती. मुलगी जेवणाच्या सुट्टीत घरी जेवण करण्यासाठी आली. जेवण झाल्यानंतर शाळेत जात होती. यादरम्यान राहुल रोकडे (वय-२२) याने मुलीला जबरदस्तीने उचलून नेत जुन्या इंग्लिश शाळेच्या शौचालयामध्ये जबरदस्तीने अत्याचार केला.
कोणाला सांगितल्यास तुला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. यावेळी मुलीने आरडाओरडा केल्याने लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. लोक येत असल्याचे पाहून आरोपीने पळ काढला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल जाधव हे करत आहेत.

Web Title: Atrocity on minor girls in Shigonda taluka