बदनामीची भीती दाखवून तरुणीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST2021-06-29T04:14:56+5:302021-06-29T04:14:56+5:30
१९ मे ते १७ जूनदरम्यान नगर-सोलापूर रोडवरील लॉज व चांदबीबी महाल परिसरात ही घटना घडली. सोहेल अख्तर सय्यद (रा. ...

बदनामीची भीती दाखवून तरुणीवर अत्याचार
१९ मे ते १७ जूनदरम्यान नगर-सोलापूर रोडवरील लॉज व चांदबीबी महाल परिसरात ही घटना घडली.
सोहेल अख्तर सय्यद (रा. मुकुंदनगर, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. नगर शहरात राहणारी तरुणी व सोहेल हे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतात. सोहेल याने या तरुणीशी मैत्री करून तिच्यासोबत २४ एप्रिल रोजी आक्षेपार्ह फोटो काढले. त्यानंतर १९ मे रोजी सोहेल या तरुणीला नगर-सोलापूर रोडवरील एका लॉजमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिला एक गोळी खाण्यास भाग पाडून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर सोहेल याने पीडित तरुणीकडे पैशांची मागणी करत पुन्हा बदनामीची भीती दाखिवली. त्यामुळे या तरुणीने घरातील आठ ग्रॅम वजनाचे दागिने आरोपीच्या हवाली केले. दरम्यान, १७ जून रोजी सोहेल याने तरुणीस जबरदस्तीने चांदबीबी महाल परिसरात नेऊन पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. शेवटी आरोपीच्या त्रासाला कंटाळून सदर तरुणीने त्याच्याविरोधात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे हे पुढील तपास करत आहेत.