नगरमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By Admin | Updated: May 15, 2015 01:22 IST2015-05-15T01:22:20+5:302015-05-15T01:22:20+5:30

रोजगार देण्याचे आमिष दाखवून बाहेरगावाहून आणलेल्या दोन अल्पवयीन मुलींना कला केंद्रात अनेक पुरुषांबरोबर अनैतिक संबंध ठेवण्यास

Atrocities on minor girls in the city | नगरमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार

नगरमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार

जामखेड (जि. अहमदनगर) : रोजगार देण्याचे आमिष दाखवून बाहेरगावाहून आणलेल्या दोन अल्पवयीन मुलींना कला केंद्रात अनेक पुरुषांबरोबर अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी कला केंद्रचालकांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बीड-जामखेड रस्त्यावरील घुंगरू कला केंद्रचालक पूजा हिरामण पवार व विशाल जाधव तसेच जामखेड-नगर रस्त्यावरील जगदंबा कला केंद्र चालक भामाबाई किसन जाधव यांनी २ जानेवारी रोजी बाहेरगावाहून दोन मुलींना जामखेडमध्ये आणले. भामाबाईने या दोनही मुलींना त्यांच्या इच्छेविरुद्ध पुरुषांसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले.
पीडित मुलींनी जामखेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिल्यानंतर बाललैंगिक अत्याचार कायदा आणि अत्याचार केल्याप्रकरणी भादंवि कलम ३७३, ३७६(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. भामाबाई किसन जाधव हिला अटक करण्यात आल्याचे जामखेड पोलिसांनी सांगितले.

Web Title: Atrocities on minor girls in the city