कोळपेवाडी परिसरातील एका विवाहितेवर अत्याचार; तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 16:41 IST2018-03-26T16:41:24+5:302018-03-26T16:41:38+5:30

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी परिसरातील एका विवाहितेच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिच्यावर चौघांनी अत्याचार केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला.

Atrocities against a married in the Kolpwadi area; Three arrested | कोळपेवाडी परिसरातील एका विवाहितेवर अत्याचार; तिघांना अटक

कोळपेवाडी परिसरातील एका विवाहितेवर अत्याचार; तिघांना अटक

कोपरगाव : तालुक्यातील कोळपेवाडी परिसरातील एका विवाहितेच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिच्यावर चौघांनी अत्याचार केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून तिघा आरोपींना अटक केली. एका फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
एका २६ वर्षीय विवाहितेच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेऊन जिवे मारण्याची धमकी देत कोळपेवाडी येथील शहानूर पठाण, कैलास कोळपे, भाऊसाहेब गाडेकर व शिवाजी कोळपे हे चौघे जण गेल्या ४-५ वर्षांपासून तिच्या घरी, तसेच शिर्डी व येवला येथील लॉजवर नेऊन विनयभंग करून जबरदस्तीने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करीत होते. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून या चौघांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून शहानूर पठाण, कैलास कोळपे व भाऊसाहेब गाडेकर यांना अटक केली आहे. तर फरार आरोपी शिवाजी कोळपे याचा शोध पोलीस घेत आहेत. फौजदार सिध्दार्थ अहिरे, सहाय्यक फौजदार अशोक कुसाळकर, पोलीस हेड कॉँस्टेबल काशिद, पोलीस नाईक अशोक शिंदे, असिर सय्यद तपास करीत आहेत.

Web Title: Atrocities against a married in the Kolpwadi area; Three arrested