कोरेगव्हाण येथे तरुणीवर अत्याचार; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 13:38 IST2018-01-04T13:37:00+5:302018-01-04T13:38:22+5:30

कोरेगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथे एका वीस वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना सोमवारी (दि. १) घडली. याबाबत बुधवारी (दि़ ३) पीडित तरुणीने बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे.

Atrocigran on the woman in Koregaon; One arrested | कोरेगव्हाण येथे तरुणीवर अत्याचार; एकास अटक

कोरेगव्हाण येथे तरुणीवर अत्याचार; एकास अटक

विसापूर : कोरेगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथे एका वीस वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना सोमवारी (दि. १) घडली. याबाबत बुधवारी (दि़ ३) पीडित तरुणीने बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे.
पीडित तरुणी ही कोरेगव्हाण येथे तिचे आजी-आजोबा यांच्याकडे राहत होते. पीडित तरुणीचे आई, वडिल कारेगाव एमआयडीसीत कामानिमित्त राहतात. एक जानेवारी रोजी तिचे आजी-आजोबा शेतात गेलेले असताना आरोपी सुनील दळवी (रा. कोरेगव्हाण) याने तिच्या घरात घुसून आतून दाराची कडी लावली व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिने ही घटना तिच्या आजी-आजोबांना सांगितली. पीडितेचे वडील मुंबईला गेलेले होते. त्यामुळे ते आल्यानंतर बुधवारी (दि. ३) दुपारी बेलवंडी पोलीस ठाण्यात आरोपीवर बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी तात्काळ आरोपी सुनिल सुभाष दळवी (रा. कोरेगव्हाण) यास ताब्यात घेऊन अटक केली.
सुनील खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्याची आई कमल यांनी केला. कमल यांनीही पीडितेच्या नातेवाईकांना शिवीगाळ केल्याचा आरोप पीडिता व तिच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान पिडीतेच्या वैद्यकीय तपासणीनंतरच तपासाला गती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे व बेलवंडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ हे करत आहेत.

Web Title: Atrocigran on the woman in Koregaon; One arrested