धोंडपारगाव ग्रामस्थांच्या वतीने आरोळे कोविड सेंटरला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:21 IST2021-05-23T04:21:35+5:302021-05-23T04:21:35+5:30
जामखेड : मोफत सेवा करणाऱ्या डॉ. आरोळे कोविड सेंटरमधील रूग्णांसाठी तालुक्यातून मदतीचा ओघ सुरूच आहे. याच अनुषंगाने धोंडपारगाव ग्रामस्थांच्या ...

धोंडपारगाव ग्रामस्थांच्या वतीने आरोळे कोविड सेंटरला मदत
जामखेड : मोफत सेवा करणाऱ्या डॉ. आरोळे कोविड सेंटरमधील रूग्णांसाठी तालुक्यातून मदतीचा ओघ सुरूच आहे. याच अनुषंगाने धोंडपारगाव ग्रामस्थांच्या वतीनेही आरोळे कोविड सेंटरला पन्नास हजार रूपये रोख, वीस क्विंटल धान्य व भाजीपाला मोफत देण्यात आला.
यावेळी प्रहार संघटनेचे राज्य प्रवक्ते संतोष पवार, आरोळे हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवी आरोळे, समन्वयक सुलताना शेख, स्वाभिमानी शेतकरी पक्ष तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, दत्ता शिंदे, विश्वदर्शनचे संचालक गुलाब जांभळे, स्वाभिमानीचे तालुका युवक अध्यक्ष राहुल पवार, धोंडपारगावचे सरपंच औदुंबर शिंदे, उपसरपंच दत्ता शिंदे, ग्रामपंचायत सदस्य कैलास शिंदे, प्रदीप शिंदे, महादेव शिंदे, राजू जाधव, लाला शिंदे, सुरेश धुमाळ, विष्णू शिंदे, हनुमंत शिंदे, रूपचंद धुमाळ, अमोल धुमाळ, तुकाराम शिंदे, सुनील धुमाळ, संपत शिंदे, संतोष शिंदे, पोपट धुमाळ, किरण शिंदे, पोपट काटे, बाळासाहेब भांडवलकर, बळी शिंदे, अमोल शिंदे, उपस्थित होते.
---
२२ धोंडपारगाव
धोंडपारगाव ग्रामस्थांचा वतीने जामखेडच्या डॉ. आरोळे कोविड सेंटरला मदत देताना प्रहार संघटनेचे राज्य प्रवक्ते संतोष पवार व इतर.