शाळा इमारत बांधण्यास सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:27+5:302021-06-29T04:15:27+5:30
देवदैठण : श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेची नवीन इमारत बांधण्यासाठी माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन ...

शाळा इमारत बांधण्यास सहकार्य करावे
देवदैठण : श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेची नवीन इमारत बांधण्यासाठी माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी केले.
नवीन इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे ते बोलत होते.
धोकादायक झालेली इमारत पाडून नवीन इमारत बांधावी, अशी अनेक दिवसांपासून ग्रामस्थांची मागणी होती. सध्या शाळा बंद असल्याने बांधकाम करणे सोपे होईल म्हणून संस्था पदाधिकारी व ग्रामस्थ यांची नुकतीच बैठक झाली. त्यात इमारतीचे बांधकामाचा निर्णय झाला होता. संस्थेने निर्णयाची अंमलबजावणी करत नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन केले. संस्था व ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्यातून सर्व भौतिक सुविधायुक्त इमारत बांधणीचा मनोदय यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष सुकुमार बोरा, शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र भटेवरा, सदस्य प्रकाश बाफना, मुख्याध्यापक संपतराव गाडेकर, लक्ष्मीकांत दंडवते, उद्योजक अतुल लोखंडे, माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ, उद्योजक वसंत बनकर, कुकडी कारखानाचे संचालक सुभाष वाघमारे, उद्योजक सर्जेराव कौठाळे, सदस्य नीलेश गायकवाड, विजय कोकाटे, रवींद्र ढवळे, दीपक वाघमारे, मच्छिंद्र ढवळे आदी उपस्थित होते.
---
मदतीचा ओघ सुरू..
पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे व उद्योजक अतुल लोखंडे यांनी इमारत बांधकामासाठी २ लाख ५१ हजार रुपये, धरमचंद ज्वेलर्सचे मालक धरमचंद फुलफगर यांच्याकडून १ लाख रुपयांचे वॉटर फिल्टर, तसेच कै. भाऊसाहेब घावटे गुरुजी यांच्या स्मरणार्थ माजी मुख्याध्यापिका विमल घावटे, संतोष घावटे, संदीप घावटे, सविता घावटे यांनी १ लाख रुपये इमारत बांधकामासाठी देणगी जाहीर केली.
---
२८ देवदैठण शाळा
देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सचिव नंदकुमार निकम यांच्या हस्ते झाले.