विधानसभा लढविणार नाही
By Admin | Updated: August 17, 2014 00:02 IST2014-08-16T23:33:04+5:302014-08-17T00:02:34+5:30
राजूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार वैभव पिचड असतील, असे स्पष्ट करत मधुकरराव पिचड यांनी आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे न जाण्याचे ठरविले आहे.

विधानसभा लढविणार नाही
राजूर : येत्या विधानसभा निवडणुकीत अकोले तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार वैभव पिचड असतील, असे स्पष्ट करत आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे न जाण्याचे ठरविले आहे.
मंत्री पिचड यांनी निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिकरित्या बोलताना ही माहिती दिली. यावेळी बोलताना मंत्री पिचड म्हणाले की, आदिवासी समाजाने मला मोठे केले. मला सन्मान मिळवून दिला. देशभरातील या समाजाचे आपण देणे लागतो. त्यादृष्टीने काम करत आलो. भविष्यातही या समाजासाठी मोठे काम करावयाचे असल्यामुळे मला मोकळीक हवी यासाठी आपण निवडणूक लढविणार नसून यावेळी वैभवच राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वीही मंत्री पिचड यांनी वैभव यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत आघाडीची घसरण झाल्याने विधानसभेसाठी स्वत: मंत्री पिचडच निवडणूक रिंगणात उतरतील अशी चर्चा होती.
मात्र त्यात तथ्य नसल्याचे सांगत मंत्री पिचड यांनी तालुक्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव पिचड असतील, असे स्पष्ट केले. पुढील काळात आपण पक्षसंघटनेसाठी काम करणार असल्याचेही पिचड यांनी यावेळी सांगितले़
(वार्ताहर)