तरुणावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:05 IST2021-01-08T05:05:12+5:302021-01-08T05:05:12+5:30
घरफोडी करून सव्वा लाखांचा ऐवज लंपास अहमदनगर : कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथे चोरट्यांनी घरफोडी करून एक लाख रुपयांची रोख ...

तरुणावर प्राणघातक हल्ला
घरफोडी करून सव्वा लाखांचा ऐवज लंपास
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथे चोरट्यांनी घरफोडी करून एक लाख रुपयांची रोख रक्कम व २० हजारांचे दागिने असा एकूण सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. २ जानेवारी रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात बाळासाहेब किसन बिडगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक भांडवलकर हे अधिक तपास करत आहेत.
बंद घराचे कुलूप तोडून चोरी
अहमदनगर: शेवगाव तालुक्यातील शेकटे खुर्द येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून ४९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. शनिवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात बबन उत्तम आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक पवार हे करीत आहेत.
बांधकाम ठिकाणावरून फरशी चोरली
अहमदनगर: केडगाव येथील लिंक रोड परिसरातील बांधकाम ठिकाणावरून चोरट्यांनी ४९ हजार ३०० रुपये किमतीची फरशी चोरून नेली. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी विनोद तुकाराम मगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक धोत्रे हे करीत आहेत.