निंबळक येथे कुटुंबावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:41 IST2021-02-28T04:41:17+5:302021-02-28T04:41:17+5:30
महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले अहमदनगर : शेवगाव येथील पाथर्डी रोडवर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले. २६ ...

निंबळक येथे कुटुंबावर प्राणघातक हल्ला
महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले
अहमदनगर : शेवगाव येथील पाथर्डी रोडवर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात अलका ज्ञानेश्वर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक ठाकरे पुढील तपास करीत आहेत.
घरफोडी करून पैसे, दागिने चाेरले
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील सोबलेवाडी येथे चोरट्यांनी घरफोडी करून ३५ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने चोरून नेले. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात रेवजी गेणू सोबले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार रोकडे पुढील तपास करीत आहेत.
बंद घराचे कुलूप तोडून केली चोरी
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील अस्तगाव येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. २६ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी पारितोष छबनराव काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार पठाण हे पुढील तपास करीत आहेत.
घरफोडी करून दोन लाखांचा ऐवज चोरला
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील किन्ही येथे चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. २६ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी अमोल रेवजी खोडदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक पदमणे पुढील तपास करीत आहेत.