नंदनवन नगरमध्ये डांबरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:16 IST2021-06-06T04:16:32+5:302021-06-06T04:16:32+5:30
यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले, सर्वांच्या सहकार्यामुळेच शहराच्या विकासाला चालना देत आहे. शहर विकासकामांमध्ये कुठलेही पक्ष राजकारण न आणता ...

नंदनवन नगरमध्ये डांबरीकरण
यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले, सर्वांच्या सहकार्यामुळेच शहराच्या विकासाला चालना देत आहे. शहर विकासकामांमध्ये कुठलेही पक्ष राजकारण न आणता सर्व भागाचा समतोल विकास साधला जात आहे. शहर विकासामध्ये विविध मान्यवरांचे व नगरसेवकांचे सहकार्य लाभत आहे. यापुढील काळातही शहर विकासासाठी कटिबद्ध आहे.
यावेळी संपत बारस्कर म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांनी सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरू केले. शहराचा नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी सर्वांची मते जाणून घेतली जातात, विकासाचे काम करीत असताना नियोजनबद्ध जमिनीअंतर्गत भुयारी गटार योजना, पाणी योजनाचे कामे मार्गी लागल्यानंतर रस्त्यांची कामे हाती घेतली .
--
फोटो- ०६ संपत बारस्कर
सावेडी परिसरातील नंदनवन नगरमध्ये रस्ता डांबरीकरणाच्या कामाचा प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. समवेत विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका मीना चव्हाण, दीपाली बारस्कर, आदी उपस्थित होते.