दांगटमळा परिसरातील आठ रस्त्यांचे डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST2021-03-07T04:19:25+5:302021-03-07T04:19:25+5:30

नवनागापूर : नवनागापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चेतना कॉलनी येथील दांगटमळा परिसरातील ८ रस्त्यांच्या कामांना सरपंच डॉ. बबनराव डोंगरे यांच्या उपस्थितीत ...

Asphalting of eight roads in Dangatmala area | दांगटमळा परिसरातील आठ रस्त्यांचे डांबरीकरण

दांगटमळा परिसरातील आठ रस्त्यांचे डांबरीकरण

नवनागापूर : नवनागापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चेतना कॉलनी येथील दांगटमळा परिसरातील ८ रस्त्यांच्या कामांना सरपंच डॉ. बबनराव डोंगरे यांच्या उपस्थितीत बुधवारी प्रारंभ करण्यात आला. एकूण १९ लाख १० हजार रुपये खर्चाची ही कामे असून, नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यावर आपला भर असणार आहे, असे डॉ. डोंगरे यांनी सांगितले.

ग्रामपंचायत ग्रामनिधीमधून मयूर रो हौसिंग सोसायटी ते दांगटमळा या रस्त्यासह इतर ७ रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना अंतर्गत पक्के रस्ते लवकरच उपलब्ध होणार आहेत. बुधवारी (दि.३) सरपंच बबनराव डोंगरे यांच्या हस्ते या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर सप्रे, दीपक गीते, अर्जुन सोनावणे, कल्पना गिते, रंजना दागट, ग्रामविकास अधिकारी संजय मिसाळ, ठेकेदार किशोर सप्रे, माजी उपसरपंच नरेश शेळके, चंद्रभान डोगरे, बाबासाहेब दागट, अशोक शेळके आदी उपस्थित होते.

Web Title: Asphalting of eight roads in Dangatmala area