आश्रमशाळेचे विद्यार्थी रमले पक्षीगणनेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:20 IST2021-03-28T04:20:37+5:302021-03-28T04:20:37+5:30
भाळवणी : जिल्हा पक्षिमित्र संघटना व राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी (ता. पारनेर) यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पक्षी ...

आश्रमशाळेचे विद्यार्थी रमले पक्षीगणनेत
भाळवणी : जिल्हा पक्षिमित्र संघटना व राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी (ता. पारनेर) यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पक्षी गणना करण्यात आली. मुख्याध्यापक संदीप महांडुळे व राष्ट्रीय हरित सेना योजनाप्रमुख शिक्षक लतीफ राजे यांच्या मार्गदर्शनात आश्रमशाळेच्या २५ विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी शाळेच्या परिसरातील ओढे व शेतात पक्षी निरीक्षण केली. परिसरात भेट देऊन जैवविविधततेचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. पक्षी निरीक्षणाचा अनुभव घेत असताना शिक्षकासमवेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी जैवविविधतेचा अभ्यास करताना पक्षी निरीक्षण करून त्यांच्या नोंदी घेतल्या. पक्ष्यांचा आवाज, रंग, आकार, हालचाल, अन्न खाण्याची पद्ध, पक्ष्यांचा अधिवास समजून पाहताना विद्यार्थी अक्षरशः हरखून गेले. सकाळच्या वेळी खंड्या, बगळा, पारवा, कावळा, चिमणी, बुलबुल, सुतारपक्षी, पोपट, मैना, वेडा राघू, साळुंकी, टिटवी, गिधाड, कोळसा आदी पक्षी दुर्बिणीतून पाहिले, असे लतिफ राजे यांनी सांगितले.