अशोक पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:39+5:302021-07-09T04:14:39+5:30
श्रीरामपूर : अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अशोक पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलद्वारे मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थ्यांची पुणेे येथील ...

अशोक पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची
श्रीरामपूर : अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अशोक पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलद्वारे मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थ्यांची पुणेे येथील ड्युरा अॅटो सिस्टिम्स व चाकणमधील कंपनीमध्ये ऑनलाईन मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली.
ड्युरा कंपनीमध्ये नकुल औताडे, रवींद्र थोरात, भूषण साळे, मयूर शिंदे, रोहित भांड, कृष्णा ढाकणे, विशाल आंधळे, अभिषेक सुपनार, शुभम जाधव, ऋषिकेश चव्हाण, अनिकेत मुसमाडे, संतोष तांबडे, निखिल तोडमल, सौरभ आहेर, मयूर देवकाते व शुभम तुवर यांची, तसेच दाणा कंपनीमध्ये प्रवीण आसने, तुषार मुलमुले व अभिषेक मेटे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना कंपनीकडून मोफत राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून वार्षिक एक लाख ८५ हजार रुपयांचे पॅकेज देण्यात येणार आहे, अशी माहिती प्राचार्य अंजाबापू शिंदे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट प्रमुख प्रा. अमोल घोडे यांनी दिली.
विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक माजी आमदार भानुदास मुरकुटे, अध्यक्ष रावसाहेब थोरात, उपाध्यक्ष दिगंबर शिंदे, अशोक कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ, उपाध्यक्ष पोपटराव जाधव, सिद्धार्थ मुरकुटे, संस्थेच्या समन्वयक मंजुश्री मुरकुटे, सचिव आबासाहेब गवारे, सहसचिव भास्कर खंडागळे, आप्पासाहेब दुशिंग यांनी कौतुक केले आहे.
--------