शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस माघारी फिरताच घातला डोक्यात दगड

By अण्णा नवथर | Updated: April 7, 2023 17:09 IST

काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिस घटनास्थळी दाखल होतात.

अहमदनगर : काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिस घटनास्थळी दाखल होतात. पोलिस येऊन गेल्यानंतर शक्यतो कुणी मारहाण करण्याची हिंमत करत नाही. बोल्हेगावात मात्र पोलिस घरी भेट देऊन गेल्यानंतर आरोपीने एकाच्या डोक्यात दगड घातला. ही घटना गुरुवारी ( दि. ६) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलिसांचा धाक संपला आहे का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 याप्रकरणी दिनेश मिसाळ ( रा. रेणुकानगर, बोल्हेगाव ) याच्यावर मारहाण केल्याचा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. संतोष संभाजी मुठे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मुलगा यश मुठे याचा गुरुवारी ( दि. ६ ) वाढदिवस हाेता. वाढदिवसासाठी त्यांनी जवळच्या काही लोकांना बोवलेले होते. वाढदिवस साजरा करून झाल्यानंतर ते सर्व रात्री अकरा वाजेच्या सुमारास जेवण्यासाठी बसलेले असता आरोपी दिनेश मिसाळ तिथे आला व  तुम्हाला जेवण करू देणार नाही, असे म्हणत तो मोठ- मोठ्याने शिविगाळ करू लागला. 

त्यामुळे मुठे यांनी घराचा दरावाजा बंद करून डायल ११२ वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. काहीवेळातच पोलिस मुठे यांच्या घरी दाखल झाले. पोलिसांनी मुठे यांना तक्रार देण्यास सांगून ते आरोपीच्या शोध घेण्यासाठी निघून गेले. त्यानंतर काहीवेळाने दिने मिसाळा हा पुन्हा मुठे यांच्या जवळा आला. त्याने संतोष मुठे यांना शिविगाळ करत मारहाण केली. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेला दगड उचलून त्याने मुठे यांच्या डोक्यात मारला. त्यात मुठे जखमी झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस