स्टुडंट आॅलंपिकमध्ये अर्शद पठाणची ‘सुवर्ण’ कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 15:30 IST2017-05-03T15:30:56+5:302017-05-03T15:30:56+5:30
कोलंबो (श्रीलंका) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्टुडंट आॅलंपिक बुद्धीबळ स्पर्धेत अर्शद पठाण याने सुवर्ण पदक पटकावले़

स्टुडंट आॅलंपिकमध्ये अर्शद पठाणची ‘सुवर्ण’ कामगिरी
आॅनलाइन लोकमत
अकोले (अहमदनगर), दि़ ३ - कोलंबो (श्रीलंका) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्टुडंट आॅलंपिक बुद्धीबळ स्पर्धेत अर्शद पठाण याने सुवर्ण पदक पटकावले़
अर्शद पठाण हा अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील बुद्धीबळपटू आहे़ विविध शालेय स्पर्धा व आंतराष्ट्रीय स्पर्धांमधून अर्शद पठाण याने चांगली कामगिरी नोंदविली़ त्यामुळे अर्शद पठाण याची भारतीय बुद्धीबळ संघात निवड झाली़ भारतीय संघ नुकताच कोलंबो दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय स्टुडंट आॅलंपिक स्पर्धेसाठी गेला होता़ या स्पर्धेत त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले़