श्रीगोंदा तालुक्यात अनोळखी पाहुण्याचे आगमन : येळपणे शिवारात आढळला काळी शराटी पक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 17:46 IST2018-10-06T17:46:36+5:302018-10-06T17:46:43+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे शिवारात एका अनोळखी पक्षी आढळून आला आहे.

श्रीगोंदा तालुक्यात अनोळखी पाहुण्याचे आगमन : येळपणे शिवारात आढळला काळी शराटी पक्षी
पंकज गणवीर
ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे शिवारात एका अनोळखी पक्षी आढळून आला आहे.
येळपणे गावातील प्रा. राजेश सांगळे यांच्या घराच्या आसपास तसेच गावातील मोबाईल टॉवरवर गेल्या तीन महिन्यांपासून या अनोळखी पाहुण्याचे वास्तव्य दिसत आहे. हा पक्षी रंगाने काळा, मोठी चोंच, एक ते दीड फुट उंचीचा आहे. कर्कश आवाज व सुमारे दीड ते दोन किलो वजन, असा रूबाबदार पक्षी दररोज दिसू लागल्याने परिसरात त्याच्याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. प्रा. सांगळे यांना बुधवारी या पक्षाचे एक किलो वजनाचे पिल्लू आढळून आले. त्यांनी ते पिल्लू पुन्हा त्यांच्या घरट्यात सोडून संवेदनशीलता दाखवून दिली.
हा पक्षी नदी, नाले, माळावर, पडिक जमिनीवर महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो. यास काळी शराटी (शेलोटी ) या नावाने ओळखले जाते. हा बगळावर्गीय पक्षी आहे. हा पक्षी महाराष्ट्रातील असून तो स्थलांतरित नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा पक्षी असल्याचे वनरक्षक संदीप भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.