चोंभूत येथे कृषिदूतांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:18 IST2021-07-25T04:18:48+5:302021-07-25T04:18:48+5:30

निघोज : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत भानसहिवरा येथील कृषी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी अभिजीत विलास ...

Arrival of agricultural envoys at Chombhut | चोंभूत येथे कृषिदूतांचे आगमन

चोंभूत येथे कृषिदूतांचे आगमन

निघोज : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत भानसहिवरा येथील कृषी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी अभिजीत विलास म्हस्के, अक्षय गोरख म्हस्के (कृषिदूत) यांचे पारनेर तालुक्यातील चोंभूत गावामध्ये आगमन झाले. दत्तात्रय म्हस्के, उपसरपंच विद्या अंकुश म्हस्के, सेवा सोसायटी अध्यक्ष लक्ष्मण म्हस्के, उपाध्यक्ष लक्ष्मण कोल्हे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संतोष खाडे, उत्तम म्हस्के, शिवाजी कोल्हे, सुरेश गायकवाड, एकनाथ कोल्हे, मंगेश सोनवणे आदींनी त्यांचे स्वागत केले.

प्रा.डॉ.अतुल दरंदले, कार्यक्रम मार्गदर्शक प्रा.एम.आर. माने, प्रा.गाजरे, सर्व विषय शिक्षकवृंदांच्या मार्गदर्शनाखाली गावातील पीक लागवड शेती पद्धती, आधुनिक शेतीची माहिती, बळीराजाला वित्तीय पुरवठा करणाऱ्या सहकारी वित्त संस्थांची कार्यक्रम पद्धती, पीक प्रात्यक्षिके, इतर शेतीबाबत माहिती संकलित करणार असून, शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणार आहे.

Web Title: Arrival of agricultural envoys at Chombhut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.