श्रीरामपूरमध्ये वाहनचालकांना लुटणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 14:51 IST2018-03-14T20:32:25+5:302018-03-15T14:51:27+5:30
रस्त्यात अडवून वाहनचालकांना लुटणाºया तीन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी वैजापूर तालुक्यातील म्हसकी येथून अटक केली.

श्रीरामपूरमध्ये वाहनचालकांना लुटणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना अटक
अहमदनगर : रस्त्यात अडवून वाहनचालकांना लुटणा-या तीन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी वैजापूर तालुक्यातील म्हसकी येथून अटक केली.
९ मार्च रोजी राजेंद्र चंद्रभान जाधव (रा़ गुजरवाडी ता. श्रीरामपूर) टाकळीभान येथून दुचाकीवरून घरी जात असताना त्यांना रस्त्यात तिघांनी अडवून मारहाण केली़ यावेळी जाधव यांची मोटारसायकल व त्यांच्याकडील मोबाईल या चोरट्यांनी चोेरून नेला़ याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्याचा श्रीरामपूरसह स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत होते़ जाधव यांना लुटणारे तिघे अल्पवयीन मुले हे वैजापूर तालुक्यातील असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़ माहितीनुसार पथकाने म्हसकी येथे जाऊन तिघांना अटक केली़ या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे़ सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील यांच्यासह मन्सूर सय्यद, कॉन्स्टेबल नानेकर, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.