गावठी कट्टा बाळगणारा एलसीबीकडून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:25 IST2021-08-22T04:25:05+5:302021-08-22T04:25:05+5:30
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की, राहुरी ते राहुरी कारखाना रोडवर असणाऱ्या साक्षी ...

गावठी कट्टा बाळगणारा एलसीबीकडून जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की, राहुरी ते राहुरी कारखाना रोडवर असणाऱ्या साक्षी हाॅटेल जवळ एकजण हा गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी घेऊन येणार आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० ॲागस्ट रोजी हाॅटेलजवळ सापळा लावला. त्यानंतर काही वेळाने संशयित हाॅटेलसमोर येऊन उभा राहिला. पथकातील अधिकारी व अंमलदार यांची खात्री होताच त्या संशयितास घेराव घालून ताब्यात घेतले. त्याचे नाव, पत्ता विचारले असता त्याने प्रेम पांडुरंग चव्हाण (३७, रा. बाजारतळ, दुबे गल्ली, श्रीरामपूर) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण ३१ हजार किमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी तो जप्त केला. पोलिसांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन आरोपीस राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.