साडे बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

By शेखर पानसरे | Updated: July 19, 2023 14:30 IST2023-07-19T14:30:11+5:302023-07-19T14:30:28+5:30

संगमनेर : साडे बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ‘तुला घरी सोडवितो’ असे सांगून अल्पवयीन ...

Arrested for abusing a twelve and a half year old girl | साडे बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

साडे बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

संगमनेर : साडे बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ‘तुला घरी सोडवितो’ असे सांगून अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून, तिला झाडा-झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात घडली होती.

पंकज शरद डुबे (रा. पेमगिरी, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पिडित मुलीच्या ४५ वर्षीय वडिलांनी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

डुबे याने अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून बळजबरीने झाडाझुडपात नेले, दोन वेगवेगळ्या ठिकाणी त्याने तिला घेऊन जात तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी मंगळवारी (दि. १८) रात्री उशिरा संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर डुबे याला पोलिसांनी अटक केल्याचे परिविक्षाधिन पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी सांगितले.

Web Title: Arrested for abusing a twelve and a half year old girl