मुलाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक करा

By | Updated: December 8, 2020 04:18 IST2020-12-08T04:18:47+5:302020-12-08T04:18:47+5:30

यावेळी आशाबाई कासार, विष्णू कासार, अंजली कासार आदी उपस्थित होते. वाळकी येथे १७ नोव्हेंबर रोजी ओंकार यास आरोपी विश्‍वजित ...

Arrest the accused who murdered the child | मुलाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक करा

मुलाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक करा

यावेळी आशाबाई कासार, विष्णू कासार, अंजली कासार आदी उपस्थित होते. वाळकी येथे १७ नोव्हेंबर रोजी ओंकार यास आरोपी विश्‍वजित रमेश कासार याने बळजबरीने गाडीत घालून दूरवर नेत लोखंडी रॉडने मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी विश्वजित कासार याच्यासह इतर सहा ते जणांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटना घडल्यापासून आरोपी फरार आहेत. आरोपींना तातडीने अटक करावी. आमच्या कुटुंबीयांच्या जीवितास काही झाल्यास याची जबाबदारी आरोपी विश्‍वजित कासार यांची राहणार आहे. हा तपास नगर तालुका पोलीस पोलिसांकडून काढून घ्यावा तसेच आरोपीला अटक केली नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा भालसिंग कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आला आहे.

विश्वजित कसार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात आधीच गुन्हे दाखल आहेत. ओेंकार भालसिंग खून प्रकरणात नगर तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही त्याचा शोध घेत आहे.

फोटो ०७ निवेदन

ओंकार भालसिंग याचा खून करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी, या मागणीचे निवेदन सोमवारी भालसिंग कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांना दिले.

Web Title: Arrest the accused who murdered the child