बंगाली डॉक्टरांचा बंदोबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST2021-06-03T04:16:04+5:302021-06-03T04:16:04+5:30
सामाजिक अंतर ठेवून मंगळवारी पिचड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील ...

बंगाली डॉक्टरांचा बंदोबस्त करा
सामाजिक अंतर ठेवून मंगळवारी पिचड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी आणि इतर वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या डॉक्टरांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करत त्यांचा माजी मंत्री पिचड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पिचड म्हणाले, तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तालुक्यातील आरोग्य विभागाचे डॉक्टर आणि कर्मचारी रात्रंदिवस याला आळा घालण्यासाठी राबत आहेत. मात्र, याच भागातील लोक आजारी पडल्यानंतर अधिकृत डॉक्टरांकडे जाण्याऐवजी अनेक खेड्यांत आपले अनधिकृत दवाखाने मांडलेल्या बंगाली डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेत असल्याची माहिती पुढे येत आहे. हे डॉक्टर त्या रुग्णांवर उपचार करत असतात आणि आदिवासी रुग्णांची लूट करत असून, योग्य उपचार न मिळाल्याने याचे दुष्परिणाम होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे या बंगाली डॉक्टरांचा शोध घेऊन आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने धाडस करत यांचा बंदोबस्त करावा. नागरिकांनी आपल्याला त्रास होत असल्यास वेळेत आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडे किंवा खासगी दवाखान्यात जाऊन उपचार करावेत, असा सल्लाही पिचड यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांना यावेळी दिला. आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घेताना इतरांचीही काळजी घेतल्यास कोरोनाचा फैलाव होणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.