संगमनेरात ६३ हजारांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 17:59 IST2019-06-04T17:58:21+5:302019-06-04T17:59:29+5:30
बंद घराच्या दरवाजाचा कुलूप, कडी कोंडा तोडून चोरट्यांनी ६३ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला.

संगमनेरात ६३ हजारांची घरफोडी
संगमनेर : बंद घराच्या दरवाजाचा कुलूप, कडी कोंडा तोडून चोरट्यांनी ६३ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. ही घटना रविवारी रात्री साडे बारा ते सोमवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास एकता चौकातील श्रमगाथा सोसायटी येथे घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
उर्मिला अनिल पावसे यांचे एकता चौकातील श्रमगाथा सोसायटीत घर आहे. त्या घरी नसताना चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कुलूप, कडी कोंडा तोडून आत प्रवेश करीत ६३ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यात सोन्या, चांदिचे दागिने व रोख रक्कमेचा समावेश आहे. पावसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेड कॉँस्टेबल विजय खंडीझोड तपास करीत आहेत.