मजूर फेडरेशनच्या अध्यक्षपदी अर्जुन बोरूडे
By Admin | Updated: September 22, 2015 00:22 IST2015-09-22T00:19:33+5:302015-09-22T00:22:11+5:30
अहमदनगर : जिल्हा मजूर फेडरेशनच्या अध्यक्षपदी अर्जुन बोरूडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सलग चौथ्यांदा बोरूडे यांना फेडरेशनचा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे.

मजूर फेडरेशनच्या अध्यक्षपदी अर्जुन बोरूडे
अहमदनगर : जिल्हा मजूर फेडरेशनच्या अध्यक्षपदी अर्जुन बोरूडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सलग चौथ्यांदा बोरूडे यांना फेडरेशनचा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. उपाध्यक्षपदी विकास जगताप यांना संधी मिळाली आहे. पदाधिकारी निवडी दरम्यान पोलिसांऐवजी खासगी सुरक्षा रक्षक यांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नुकत्याच झालेल्या मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत बोरूडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंडळाने २० पैकी १७ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिध्द केले होते. त्यानंतर सोमवारी फेडरेशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी फेडरेशनच्या कार्यालयात बैठक बोलवण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हा उपनिबंधक चेतन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अध्यक्षपदी बोरूडे यांच्या निवडीचा एक मुखी निर्णय घेण्यात आला आहे.
उपाध्यक्षपदी जगताप यांच्या निवडीसाठी आ. अरू ण जगताप, आ. शिवाजी कर्डिले, आ. संग्राम जगताप यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा आ. जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी संचालक प्रशांत गायकवाड, अनिल पाचपुते, लिलावती लाळगे, रवींद्र कुलकर्णी, राजू फकीर, अर्जुन फडके, सुरेश बानकर, नामदेव ढोकणे, उत्तम घोगरे, बाबासाहेब परजणे, शंकरराव गायकवाड, देवीदास पारासूर, बाबूराव पवार, विजय गायकवाड, संगीता वाघ, विद्या काळे आदी उपस्थित होते. निवडीनंतर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या खासगी सुरक्षा रक्षकांच्या विषयाची चांगलीच चर्चा झाली.
(प्रतिनिधी)