मोबाईलवरून वाद, मित्रानेच केला मित्राचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:06+5:302021-09-02T04:45:06+5:30
मिनिनाथ मच्छिंद्र अडसरे (रा. कायनेटिक चौक, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अडसरे याने त्याचा मित्र विकास महादेव ...

मोबाईलवरून वाद, मित्रानेच केला मित्राचा खून
मिनिनाथ मच्छिंद्र अडसरे (रा. कायनेटिक चौक, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अडसरे याने त्याचा मित्र विकास महादेव कदम (रा.केडगाव) याचा खून केला होता. आरणगाव बायपास रोडजवळ २५ ऑगस्ट रोजी एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी नगर तालुका पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी या घटनेचा तत्काळ तपास सुरू करत मयताची ओळख पटवली. मयताचे नाव विकास कदम असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी सर्व बाजूने तपास केला तेव्हा कदम याचा खून त्याचा मित्र अडसरे यानेच केल्याचे समोर आले. अडसरे याने कदम याचा मोबाईल घेऊन त्यांच्या मालकांना दिला होता. तसेच कदम याला कामावरूनही काढून टाकले होते. या कारणामुळे दोघांमध्ये वाद होता. या वादातून अडसरे याने कदम याला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र सानप, सहायक फौजदार पठाण, हेड कॉन्स्टेबल रमेश गांगर्डे, पोलीस नाईक भानुदास सोनवणे, धर्मराज दहिफळे, रवी सोनटक्के आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
---------
फोटो ३१ आरोपी
मित्राचा खून करणाऱ्या आरोपीला नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले.