श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगावच्या सरपंचाविरुध्दचा अविश्वास ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 14:11 IST2018-06-13T14:11:06+5:302018-06-13T14:11:50+5:30
लिंपणगावच्या (ता. श्रीगोंदा) सरपंच रेणुका धस यांच्या विरोधात दाखल अविश्वास ठराव १० विरूद्ध शून्य मतांनी मंजूर झाला.

श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगावच्या सरपंचाविरुध्दचा अविश्वास ठराव मंजूर
काष्टी : लिंपणगावच्या (ता. श्रीगोंदा) सरपंच रेणुका धस यांच्या विरोधात दाखल अविश्वास ठराव १० विरूद्ध शून्य मतांनी मंजूर झाला.
तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदस्यांच्या बैठक झाली. बैठकीस १५ पैकी १० सदस्य उपस्थित होते. सरपंच धस यांच्यासह पाच सदस्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. तहसिलदारांनी सरपंचाविरुध्द दाखल अविश्वास ठराव १० विरूद्ध ० मतांनी मंजूर झाल्याचे जाहीर केले. सरपंच पदासाठी माधुरी साळवे, रवी उजागरे, मंजुळा ओव्हळ यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. पाचपुते गटाकडून माधुरी साळवे, नागवडे गटाकडून रवी उजागरे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.