वाढत्या रुग्णसंख्येने सुपा, भाळवणी, टाकळी ढोकेश्वरमध्ये चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST2021-04-30T04:25:58+5:302021-04-30T04:25:58+5:30
पारनेर : महिनाभरापासून पारनेर तालुक्यातील भाळवणी, सुपा, टाकळी ढोकेश्वर परिसरात कोरोना रुग्णसंख्येतील होणारी वाढ थांबण्याचे नाव घेत नाही. सकाळी ...

वाढत्या रुग्णसंख्येने सुपा, भाळवणी, टाकळी ढोकेश्वरमध्ये चिंता
पारनेर : महिनाभरापासून पारनेर तालुक्यातील भाळवणी, सुपा, टाकळी ढोकेश्वर परिसरात
कोरोना रुग्णसंख्येतील होणारी वाढ थांबण्याचे नाव घेत नाही. सकाळी दिलेल्या निर्धारित वेळेत गावागावामध्ये गर्दी होत असून याचे नियोजन करण्यात स्थानिक ग्राम समित्यांचे दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यात कोरोनाचे दररोज १४० ते १५० रुग्ण आढळत आहेत. बुधवारी सर्वाधिक ३०० रुग्ण एकाच दिवशी बाधित झाले होते. यामध्ये सुपा येथे सर्वाधिक ३३ रुग्ण आहेत. भाळवणी, टाकळी ढोकेश्वरमध्ये दररोज ८ ते १० रुग्ण वाढत आहेत. याबरोबरच वेसदरे, पिंपळगाव रोठा, मांडवे, खडकवाडी, म्हसोबा झाप, ढवळपुरी, किन्ही येथेही संख्या वाढत आहे.
भाळवणीत संख्या का वाढतेय असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बैठकीत विचारले होते. बैठक होऊन आठवडा उलटला तरी भाळवणी, टाकळी ढोकेश्वरमध्ये स्थानिक प्रशासनाला रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी यश आलेले नाही.
--
आम्ही ग्रामस्थांना बाहेर फिरू नका, असे सांगितले आहे. तरीही गर्दी होत आहे. ग्रामस्थांनी स्वत:ची काळजी घ्यावी. त्यांना अडचणी आल्यास ग्रामपंचायत पदाधिकारी किंवा सदस्य यांच्या बरोबर संपर्क करावा.
-सागर मेड,
उपसरपंच, सुपा
----
तालुका प्रशासनाच्या वतीने तालुक्यात पारनेर शहर, टाकळी ढोकेश्वर, भाळवणी येथे कारवाई केली आहे. टाकळी ढोकेश्वर येथे कडक अंमलबजावणी करीत आहेत. तर सुपा येथील गर्दीवर कारवाई केली जाईल.
-ज्योती देवरे,
तहसीलदार, पारनेर