भिंगार पोलिसांनी केल्या फिरणाऱ्यांच्या अँटिजन चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:21 IST2021-05-19T04:21:29+5:302021-05-19T04:21:29+5:30
सध्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने जिल्ह्यात कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सध्या भिंगारमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत ...

भिंगार पोलिसांनी केल्या फिरणाऱ्यांच्या अँटिजन चाचण्या
सध्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने जिल्ह्यात कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सध्या भिंगारमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने जीवनावश्यक सुविधा वगळता सर्वच आस्थापना, दुकाने बंद आहेत. मात्र, तरीही नागरिक विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन फिरताना दिसत होती. यासाठी वाहने जप्त करण्याची मोहीमही पोलिसांनी हाती घेतली. मात्र तरीही कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने भिंगार पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
मंगळवारी भिंगार पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांकडून ७१ हजार ७०० रुपये दंड वसूल केला. नाकाबंदीदरम्यान डीएसपी चौक येथे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या पथकाने विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या एकूण २५ लोकांची अँटिजन चाचणी केली. त्यात कोणीही पॉझिटिव्ह मिळून आले नाही. भिंगार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, तसेच इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.