ॲंटिजनचा पॉझिटिव्ह रेट १० टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:21 IST2021-05-19T04:21:25+5:302021-05-19T04:21:25+5:30
अहमदनगर : मागील आठवड्यात जिल्ह्यातील रॅपिड ॲंटिजन चाचण्यांचा पॉझिटिव्ह रेट २५ टक्क्यांवर गेला होता. तो आता १०.११ ...

ॲंटिजनचा पॉझिटिव्ह रेट १० टक्क्यांवर
अहमदनगर : मागील आठवड्यात जिल्ह्यातील रॅपिड ॲंटिजन चाचण्यांचा पॉझिटिव्ह रेट २५ टक्क्यांवर गेला होता. तो आता १०.११ टक्के इतका खाली आला आहे. नगर शहरातील रुग्णसंख्या ही कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी घट झाली आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ॲंटिजन चाचण्यांच्या अहवालावर नजर टाकल्यास पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या घटली आहे. मागील आठवड्यात ॲंटिजन चाचण्यांचा पॉझिटिव्ह दर २५ टक्क्यांपर्यंत गेला होता. तो कमी होऊ लागला असून, कठोर निर्बंध लागू केल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. सर्वप्रथम अहमदनगर महापालिकेने नगर शहरात कठोर निर्बंध लागू केले. त्यामुळे नगर शहरातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.नगर शहरात मंगळवारी १३१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. मागील आठवड्यात हा आकडा पाचशेच्या घरात गेला होता. तो आता कमी होऊ लागल्याने महापालिकेचा नगर पॅटर्न जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असलेल्या तालुक्यात लागू करण्यात येत आहे. संगमनेर, राहुरी, कोपरगाव, अकोले तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून, इतर तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.
....
तालुक्याचा पाॅझिटिव्ह रेट असा
अकोले-९.५५
जामखेड-३.१०
कर्जत- ८.५२
कोपरगाव- ५.०८
नगर- ११.५२
नेवासा- ११.३७
पारनेर- ११.३७
पाथर्डी- १५.५५
राहाता- १२.३९
राहुरी- ११.५३
संगमनेर- ८.७२
शेवगाव- ७.०३
श्रीगोंदा- १३.७८
श्रीरामपूर- ८.४४