अकोलेत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह आढळला; तालुक्यातील बाधितांची संख्या तीनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 11:02 IST2020-05-27T10:56:34+5:302020-05-27T11:02:36+5:30
अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील ३९ वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या आता तीन झाली आहे.

अकोलेत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह आढळला; तालुक्यातील बाधितांची संख्या तीनवर
अकोले : तालुक्यातील समशेरपूर येथील ३९ वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या आता तीन झाली आहे.
यापूूर्वी लिंगदेव, ढोकरी आणि मंगळवारी समशेरपूर गावात कोरोना बाधित सरकारी तपासणीत निष्पन्न झाले आहे. समशेरपूर येथील सदर इसम १९ मे रोजी मुलुंड मुबंई येथून आला होता. त्यास विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. २४ तारखेला त्याला त्रास होवू लागल्याने नाशिक येथे तपासणी व उपचारासाठी पाठविण्यात आले. मंगळवारी सायंकाळी त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सांगितले. समशेरपूर भागातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
सदर व्यक्तीचे पाच सहा जणांचे कुटुंब गावाला आले आहे. ते सरकारी परवानगी न घेता आले होते. त्यांना होमक्वॉरंटाईन करण्यात आले आहे, असे आरोग्यविभागाकडून सांगण्यात आले. मुंबईहुन गावाकडे परतलेल्या चाकरमान्यांनी आरोग्यविभागाच्या डोकेदुखी वाढली आहे. समशेरपूर गाव प्रतिबंधक क्षेत्र करण्याची प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे.