शहरात आणखी एक कन्टेनमेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:22 IST2021-04-02T04:22:01+5:302021-04-02T04:22:01+5:30

....... मनपाच्या इमारतीतच पाण्याची बोंब अहमदनगर : महापालिकेच्या औरंगाबाद रोडवरील प्रशासकीय इमारतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे ...

Another containment in the city | शहरात आणखी एक कन्टेनमेंट

शहरात आणखी एक कन्टेनमेंट

.......

मनपाच्या इमारतीतच पाण्याची बोंब

अहमदनगर : महापालिकेच्या औरंगाबाद रोडवरील प्रशासकीय इमारतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याचे पाणी नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांचीही गैरसोय झाली आहे.

...

दीपाली ट्रान्सपोर्टला नोटीस

अहमदनगर : शहरातील काही भागाला टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महापालिकेने हे काम दीपाली ट्रान्सपोर्ट या संस्थेला दिले आहे. मात्र, वारंवार सूचना देऊनही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दीपाली ट्रान्सपोर्टला गुरुवारी नोटीस बजावली आहे.

...

शनीधाम वसाहतीत निर्जळी

अहमदनगर : बोल्हेगाव येथील शनीधाम वसाहतीतील नागरिकांना अद्याप नळजोडणी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, या भागातील नागरिकांना पिण्याच्या पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून गुरुवारी करण्यात आली.

....

हेडगेवार यांना अभिवादन

अहमदनगर : महापालिकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, संजय ढोणे, माजी नगरसेवक सचिन जाधव, सतीश शिंदे, पुष्कर कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Web Title: Another containment in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.