नटराजमध्ये आणखी ५० बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:18 IST2021-04-05T04:18:43+5:302021-04-05T04:18:43+5:30

--------- बाजार पुन्हा रस्त्यावर अहमदनगर : सावेडी उपनगरातील एकविरा चौक ते पारिजात चौक या रस्त्यावर भाजी विक्रेते पथारी टाकून ...

Another 50 beds in Nataraja | नटराजमध्ये आणखी ५० बेड

नटराजमध्ये आणखी ५० बेड

---------

बाजार पुन्हा रस्त्यावर

अहमदनगर : सावेडी उपनगरातील एकविरा चौक ते पारिजात चौक या रस्त्यावर भाजी विक्रेते पथारी टाकून बसत आहेत. मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसून, महापालिकेचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

......

लसीकरणाला गती

अहमदनगर: कोरोनावरील लस घेण्यासाठी नागरिक स्वत: हून गर्दी करू लागले असून, महापालिकेच्या लसीकरणाला गती आली आहे. परंतु, लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस न घेता माघारी जावे लागत असल्याने डोसची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

...

पाणीपुरवठ्याबाबत बैठक

अहमदनगर: शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापालिकेत बैठक बोलविण्यात आली आहे. शहरातील पाणी वितरणाबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याने या बैठकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

....

Web Title: Another 50 beds in Nataraja