जिल्ह्यात आज सायंकाळी वाढले आणखी १० कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 19:14 IST2020-06-30T19:14:42+5:302020-06-30T19:14:52+5:30

अहमदनगर:सकाळी १९ जणा पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पुन्हा सायंकाळी दहा जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये नगर शहरातील सात जण, तर भिंगार शहरातील पाच जणांचा समावेश आहे.

Another 10 corona infested in the district this evening | जिल्ह्यात आज सायंकाळी वाढले आणखी १० कोरोना बाधित

जिल्ह्यात आज सायंकाळी वाढले आणखी १० कोरोना बाधित

अहमदनगर:सकाळी १९ जणा पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पुन्हा सायंकाळी दहा जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये नगर शहरातील सात जण, तर भिंगार शहरातील पाच जणांचा समावेश आहे.

आज सायंकाळी एकूण १० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जामखेड येथील ४२ वर्षीय पुरुष बाधित आढळून आला. परळ (मुंबई) येथून पिंपरी पठार (पारनेर) येथे आलेला २८ वर्षीय पुरुष बाधित आढळून आला आहे. राजुरी (ता.जुन्नर, जि. पुणे) येथील ३६ वर्षीय पुरुष बाधित आढळून आला आहे.

नगर शहरातील बालिकाश्रम रोड बागवान मळा येथील एकाच कुटुंबातील ९ वर्षीय मुलगा आणि १२ वर्षीय मुलगी बाधित झाली आहे. नगर शहरातील चितळे रोड येथील ३६ वर्षीय पुरुष बाधित झाली आहे. श्रीरामपूर येथील ७० वर्षीय महिला बाधित आढळून आली आहे.

नगर शहरातील ढवण वस्ती येथील २८ वर्षीय पुरुष बाधित झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ५५ वर्षीय महिला बाधित झाली आहे. नगर शहरातील एकवीरा चौक पद्मा नगर येथील ७५ वर्षीय महिला बाधित आढळून आली आहे.

Web Title: Another 10 corona infested in the district this evening